भारतात अनेकांना पान खायला आवडते. यामुळे प्रत्येक गल्लीबोळ्यात एकतरी पान टपरी दिसेल. याशिवाय बहुतेकांच्या घरात आजी- आजोबाही सतत पान चळखताना दिसतात. काहींना कत्था, चुना टाकलेला पान खायला आवडतो तर काही गोड पान खाणे पसंत करतात. अनेक पानवाले गोड पानात गुलकंद टाकतात हे तुम्हाला माहीत असेल, पण तुम्ही विचार करत असाल की गुलकंद नेमक काय असत आणि ते कसं बनवलं जात. आज आम्ही एक व्हिडीओ दाखवणार आहोत ज्यात तुम्हाला गुलकंद नेमक कसं बनवल जात ते दाखवण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पानात वापरला जाणारा गुलकंद कसा बनवला जातो?

साखर आणि गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद बनवला जातो. गुलकंदाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे जाम आणि मुरंबासारखे दिसते. आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका छोट्या कारखान्यात गुलकंद कसा बनवला जातो हे दाखवण्यात आले आहे. हा पदार्थ बनवण्याची सोप्पी पद्धत व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे. एका कारखान्यात कामगार गुलाबाच्या पाकळ्यांची मोठी पोती उघडतात. भारतातील रोझ गार्डन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमधील पुष्कर या शहरात या गुलाबांची कापणी केली जाते.

गुलाबाच्या पाकळ्या त्याच्या देठापासून वेगळ्या केल्या जातात. यानंतर पंखाच्या साहाय्याने केवळ पाकळ्याच वेगळ्या केल्या जातात. यानंतर त्यात खूप साखल मिसळली जाते आणि घट्ट मॅश केली जाते. जातात. शेवटी गुलाब आणि साखरेचे हे मिश्रण स्टीलच्या कंटेनरमध्ये ठेवले जाते ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर मिसळली जाते. गुलाब आणि साखर यांचे मिश्रण वापरण्यासाठी तयार होण्यापूर्वी दोन महिने मॅरीनेट करण्यासाठी स्टीलच्या कंटेनरमध्ये ठेवले जाते. त्यानंतर गुलकंद तयार होते. हा फॅक्टरी व्हिडिओ अमर सिरोही यांनी तयार केला आहे, जो Instagram आणि YouTube वर Foodie Incarnate नावाचे लोकप्रिय फूड व्लॉगिंग अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, गुजरातमध्ये नैसर्गिकरित्या २००० किलो गुलकंद बनवण्याचा व्हिडिओ, आयुर्वेदातील सर्वात स्वादिष्ट खाद्यपदार्थ. या व्हिडीओला १ लाख ८७ हजारांहून अधिक व्हूज आणि तीन हजार लाईक्स मिळाले आहे.

ग्रॅज्युएशन सेरेमनीत डान्स करणे विद्यार्थ्याला पडले महागात, शिक्षकांनी भर प्रेक्षकांसमोर काढली लाज अन्…; पाहा Video

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बहुतेक लोकांनी ही स्वादिष्ट गुलकंद खाण्याची इच्छा व्यक्त केली, तर काही युजर्सनी अस्सल गुलकंद हे साखरेपासून नाही तर मधापासून बनले जाते. याशिवाय एका युजरने, साखरेपासून बनवलेले पदार्थ कसे आरोग्यदायी असू शकते असा सवाल केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you love to eat paan then wait for second first watch video how to making natural gulkand in gujarat watch food viral video sjr