सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ गंभीर असतात. असे व्हिडीओ आपल्या कायम लक्षात राहतात. असं म्हणतात, परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोटाची भूक भागवण्यासाठी अनेक जण काहीही करतात, जरी याचा त्रास झाला तरी त्यांच्याजवळ दुसरा पर्याय नसतो. कुटुंबाच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी घरचा कर्ता स्वत: कष्ट घेऊन हाताला येईल ते काम करतो. मग यात त्याला किती त्रास होईल याचा विचार तो कधीच करत नाही. सध्या असाच काहीसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकेल.

हेही वाचा… एका कोपऱ्यात लपून करत होते किस, सुरक्षा रक्षकाने पकडलं अन्…, विद्यार्थ्यांचा अश्लील चाळे करताना VIDEO व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, दर्शनाला आलेले भाविक, भक्त आपल्या आनंदासाठी दुसऱ्यांना कष्ट देताना दिसतायत. या व्हिडीओमध्ये काही माणसं आपल्या मजेसाठी तिथे काम करत असणाऱ्या माणसांच्या पाठीवर जाऊन बसतात आणि तिथे फिरतात. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, तिथे काम करणारे कर्मचारी खूप ताकद लावून मेहनतीने त्या माणसांना त्यांच्या पाठीवर उचलत आहेत. या कामगारांच्या मागे एक बास्केट लावलं आहे. त्या बास्केटमध्ये ही माणसं बसलेली दिसतायत.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ @innocent_author01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “ऐसी भक्ति/ दर्शन से क्या लाभ जो दुसरों को कष्ट देके मिले…! (“अशा भक्ती/दर्शनाचा काय फायदा जो इतरांना दुःख देऊन प्राप्त होतो?)

हेही वाचा…

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “असा कोणाला त्रास देऊन यात्रा करू नका”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “दोन वेळच्या अन्नासाठी काय काय करावं लागतं.” तर एक जण कमेंट करत म्हणाला, “गरिबी माणसाला काहीही करायला लावते.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of a workers carrying a men on their back shocking video dvr