scorecardresearch
  • अभिजात 2025

अभिजात लिटफ़ेस्ट

लोकसत्ता अभिजात लिटफ़ेस्ट’च्या निमित्ताने मराठीच्या ऐश्वर्याचा सौंदर्यसोहळा प्रथमच अशा पद्धतीने आयोजित केला जात असून नाविन्यपूर्ण, विशेष रचित कार्यक्रम हे त्याचे वैशिष्ट्य असेल . या कार्यक्रमात जुनेजाणते जसे सहभागी होतील तसे नवे, उद्याचे आश्वासक कलाकारही रसिकांना लुभावतील. मराठी साहित्य, विविधांगी कला, संस्कृतीचा कलाविष्कार या कार्यक्रमांतर्गत अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ८ दिवस संपन्न होणाऱ्या या महोत्त्सवातून जगणे समृद्ध करण्यास आवश्यक साहित्य , चित्र, नाट्य, संगीत अशा क्षेत्रांचा कलात्मक आनंद लुटता येईल.