बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद झिलऊर रेहमान यांचे बुधवारी सिंगापूरमधील माऊण्ट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजिबूर रेहमान यांचे निकटचे सहकारी असलेल्या मोहम्मद झिलऊर रेहमान यांच्यावर मूत्रपिंड आणि श्वसनाच्या विकारावर उपचार सुरू होते. बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्यांचे पुत्र, कन्या आणि जवळचे नातेवाईक हजर होते. डिसेंबर २००८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लीग विजयी झाल्यानंतर मोहम्मद झिलऊर रेहमान यांना देशाच्या अध्यक्षपदी समारंभपूर्वक बसविण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh president rehman is passed away