रेल्वेतील लाचखोरीच्या प्रकरणामुळे मंत्रिपद गमवावे लागलेल्या पवनकुमार बन्सल यांची मंगळवारी दुपारी सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. सीबीआयने बन्सल यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर व्हावे, असे समन्स बजावले होते. त्यानुसार मंगळवारी दुपारी नवी दिल्लीमध्ये चौकशी करण्यात आली.
बन्सल यांचा भाच्चा विजय सिंगला याला ९० लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयच्या अधिकाऱयांनी अटक केली होती. रेल्वे मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यासाठी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेशकुमार यांच्याकडून आपल्या भाच्यामार्फत कोट्यवधीची सौदेबाजी केल्याचा आरोप बन्सल यांच्यावर होता. विरोधकांनी बन्सल यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
सीबीआयने महेशकुमार यांच्या नेमणुकीसंदर्भातील सर्व कागदपत्रे जप्त केली आहेत. महेशकुमार, सिंगला आणि बन्सल यांचे स्वीय सहायक राहुल भंडारी यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यानंतर आता बन्सल यांची चौकशी करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bribery case cbi questions pawan kumar bansal