कर्नल सोफिया कुरेशींच्या घरावर हल्ला?, RSS चा उल्लेख करत सोशल मीडियावर बोगस पोस्ट
पहलगामवरील हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असून, सोशल मीडियावर अफवा पसरवून गोंधळ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. कर्नल सोफिया कुरेशी यांच्या घरावर हल्ला झाल्याची खोटी पोस्ट एक्सवरून शेअर करण्यात आली होती. कर्नाटक पोलिसांनी ही पोस्ट खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पाकिस्तान पुरस्कृत सायबर हल्ल्यांची माहिती दिली असून, १५ लाख हल्ल्यांपैकी १५० यशस्वी ठरले आहेत.