पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षणाचा प्राणपणाने पुरस्कार करणारी शाळकरी मुलगी मलाला युसूफझाई हिचे वडील झियाउद्दीन युसूफझाई यांना संयुक्त राष्ट्रांनी जागतिक शिक्षण सल्लागार म्हणून नेमले आहे. तालिबान्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या मलाला हिच्यावर सध्या लंडन येथे उपचार सुरू आहेत. तिच्या वडिलांनी पाकिस्तानातील अत्यंत संवेदनशील अशा भागात शिक्षक म्हणून काम केले आहे. तालिबान्यांची दहशत झुगारून त्यांनी व त्यांच्या मुलीने शिक्षणाचा जो पुरस्कार केला त्याला तोड नाही. २०१५ पर्यंत जगातील सर्व मुलींना शालेय शिक्षण देण्यासाठीच्या युनोच्या योजनेला मलालाचे नाव देण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malalas father world education advisor of uno