पंजाब विधिमंडाच्या विशेष अधिवेशनामध्ये सरबजित सिंग याला ‘राष्ट्रीय हुतात्मा’ हा दर्जा बहाल करण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. तसेच पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये सरबजित याच्यावर करण्यात आलेल्या निर्घृण हल्ल्याचा तपास आणि चौकशी एखाद्या आंतरराष्ट्रीय मात्र निष्पक्ष यंत्रणेद्वारे करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.भारत सरकारने पाकिस्तान सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच या हल्ल्यामागील नेमके कारण आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानला प्रवृत्त करावे, असेही पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab assembly declares sarabjit singh martyr of the nation