आयपीएलवरील करोना व्हायरसचं संकट आणखी गडद होताना दिसतंय. दिल्ली कॅपिटल्स संघामधील टीम सेफर्ट या आणखी एका परदेशी खेळाडूची करोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. सेफर्टनंतर दिल्लीच्या ताफ्यात करोनाबाधितांचा आकाडा सहावर पोहोचला आहे. असे असताना आता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या २२ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये होणारा सामना पुण्याऐवजी मुंबईत खेळवला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> RCB vs LSG : ‘बेटा, तुमसे ना हो पायेगा’ म्हणणाऱ्या लखनऊची आरसीबीने केली बोलती बंद!; पराभूत करत दिले प्रत्युत्तर

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील दिल्ली कॅपिट्लस आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये होणारा ३४ वा सामना नियोजनानुसार पुण्यातील एमसीए स्टेडियमवर होणार होता. मात्र दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात याआधी पाच जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर आज दिल्लीच्याच टीम सेफर्ट या परदेशी खेळाडूला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता २२ एप्रिल रोजी होणाऱ्या दिल्ली कॅफिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमधील सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. हा सामना आयपीएलच्या नियोजनानुसार पुण्यातील एमसीए स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता होणार होता. मात्र आता हा सामना पुणेऐवजी मुंबईतीली वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

हेही वाचा >>> बंगळुरुने डीआरएस घेतला अन् राहुल झाला बाद, लखनऊचा पराभव समोर दिसताच अथिया शेट्टीचा उतरला चेहरा

सामन्याचे ठिकाण वगळता दिल्ली आणि राजस्थान रॉयल्समधील सामन्यात अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, २० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्याचे ठिकाणदेखील बदलण्यात आले आहे. संभाव्य करोना संसर्गामुळे हा निर्णय घेण्यात आलाय.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 match venue of rr vs dc changes from mca pune to wankhede stadium mumbai due to corona prd
First published on: 20-04-2022 at 20:00 IST