IPL Auction 2025 Day 2 Live Updates, 25 November 2024: आयपीएल २०२५चा महालिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे पार पाडला. अनेक खेळाडूंवर विक्रमी बोली लागल्या तर काही खेळाडूंनी इतिहासही रचला. स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला लखनौ सुपर जायंट्सने (एलएसजी) २७ कोटी रुपयांना संघात सामील केले. तर श्रेयस अय्यर २६.७५ कोटींना पंजाब किंग्सच्या ताफ्यात सामील झाला, जो या लिलावातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर १३ वर्षांचा खेळाडू वैभव सूर्यवंशीसाठी पहिल्याच लिलावात कोट्यवधींची बोली लागली.

Live Updates

IPL Mega Auction 2025 Day 2 Highlights: आयपीएल २०२५ महालिलावाच्या दुसऱ्या दिवसाच्या हायलाईट्स

18:25 (IST) 25 Nov 2024

IPL Live Updates: टीम डेव्हिड आरसीबीच्या ताफ्यात

मुंबईच्या ताफ्यात असलेला टीम डेव्हिड आता आरसीबी संघाचा भाग झाला आहे. हैदराबाद आणि आरसीबीमध्ये बोली सुरू होती पण अखेरीस आरसीबीने बाजी मारत ४ कोटींना संघात सामील केलं आहे.

18:24 (IST) 25 Nov 2024

IPL Live Updates: शाहबाज अहमद

भारताचा फिरकीपटू शाहबाज अहमदसाठी हैदराबाद आणि लखनौसाठी बोली लावली जात होती. अखेरीस लखनौने बाजी मारत २.४ कोटींना संघात सामील केलं.

18:20 (IST) 25 Nov 2024

IPL Live Updates: शरफेन रूदरफोर्ड

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू शरफेन रूदरफोर्ड २.६० कोटींना गुजरात संघाचा भाग झाला आहे.

18:18 (IST) 25 Nov 2024

IPL Live Updates: मनिष पांडे

मनिष पांडेची मूळ किंमत ७५ लाखांसह केकेआरच्या ताफ्यात सामील केलं आहे.

18:16 (IST) 25 Nov 2024

IPL Live Updates: अनकॅप्ड फिरकीपटू

प्रशांत सोलंकी, जथावेद सुब्रमण्यम हे अनकॅप्ड फिरकीपटू अनसोल्ड

18:13 (IST) 25 Nov 2024
IPL Live Updates: एम सिद्धार्थ

एम सिद्धार्थला लखनौ संघाने एम सिद्धार्थला पुन्हा एकदा बोली लावत ७५ लाखांना संघात सामील केले. तर दिग्वेश सिंगलाही संघाने मूळ किमतीसह लखनौ संघाने खरेदी केले.

18:12 (IST) 25 Nov 2024

IPL Live Updates: जीशान अन्सारी

हैदराबाद आणि दिल्लीत बोलीचा मुकाबला सुरू असताना हैदराबादने बाजी मारत अन्सारीला ४० लाखांना संघात सामील केलं.

18:10 (IST) 25 Nov 2024

IPL Live Updates: अनकॅप्ड वेगवान गोलंदाज

साकिब हुसैन, विद्वथ कवेरप्पा, राजन कुमार हे अनकॅप्ड वेगवान गोलंदाज अनसोल्ड

18:10 (IST) 25 Nov 2024

IPL Live Updates: मुकेश चौधरी

चेन्नईच्या ताफ्यातील वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीला पुन्हा एकदा सीएसकेने ३० लाख मूळ किमतीसह संघात सामील केलं आहे.

18:09 (IST) 25 Nov 2024

IPL Live Updates: गुरनूर ब्रार

अनकॅप्ड वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार ३० लाखांच्या मूळ किमतीसह लिलावात उतरला. चेन्नई-गुजरातच्या बोलीमध्ये गुजरातने बाजी मारत गुरनूरला १.३ कोटींना संघात सामील केले.

18:06 (IST) 25 Nov 2024

IPL Live Updates: अनकॅप्ड अष्टपैलू

मयंक डागर, अनुकूल रॉय, अविनाश अरावेल्ली, वंश बेदी, हार्विक देसाई हे अनकॅप्ड अष्टपैलू अनसोल्ड

18:05 (IST) 25 Nov 2024

IPL Live Updates: स्वप्निल सिंग

आरसीबीच्या ताफ्यात असलेला अष्टपैलू खेळाडू स्वप्निल सिंगसाठी आरसीबीने राईट टू मॅच कार्ड वापरत ५० लाखांना संघात कायम ठेवलं आहे. आरसीबीने सर्वात आधी बोली लावली त्यानंतर दिल्लीने उडी घेताच आरसीबीने ३५ लाखांवर माघार घेतली. यानंतर दिल्लीने त्याला संघात सामील करण्याची ५० लाख किंमत सांगितली आणि आरसीबीने राईट टू मॅच कार्ड वापरलं.

18:03 (IST) 25 Nov 2024

IPL Live Updates: दर्शन नळकांडे

दर्शन नळकांडे ३० लाखांच्या मूळ किमतीसह दिल्लीच्या ताफ्यात सामील झाला आहे.

18:00 (IST) 25 Nov 2024

IPL Live Updates: अरशद खान

अरशद खानसाठी दिल्ली आणि गुजरातमध्ये बोली लावण्यासाठी चढाओढ सुरू झाली. ३० लाख मूळ किंमत असलेला अरशद १.५० कोटींना गुजरातच्या संघात सामील झाला आहे.

17:57 (IST) 25 Nov 2024
IPL Live Updates: अंशुल कंबोज

भारताचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज ज्याने नुकतीच देशांतर्गत क्रिकेटपटूमध्ये सध्या चांगली कामगिरी केली याचबरोबर तो पूर्वी मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्याच्यासाठी दिल्लीने बोली लावली. यानंतर चेन्नई आणि मुंबईमध्ये बोली लावण्याची चढाओढ सुरू होती.अखेरीस चेन्नईने ३.४० कोटींना चेन्नई संघाने सामील करून घेतलं.

17:54 (IST) 25 Nov 2024

IPL Live Updates: अनकॅप्ड फलंदाज

स्वस्तिक चिकारा, माधव कौशिक, पुखराज मान हे अनकॅप्ड फलंदाज अनसोल्ड

17:53 (IST) 25 Nov 2024

IPL Live Updates: हिंमत सिंग

भारताचा अनकॅप्ड फलंदाज हिंमत सिंहला ३० लाख रूपयांना लखनौ सुपर जायंट्सने संघात सामील केलं आहे.

17:52 (IST) 25 Nov 2024
IPL Live Updates: शेख रशीद

अनकॅप्ड फलंदाज शेख रशीदला चेन्नई सुपर किंग्सने ३० लाख मूळ किंमतीसह संघात सामील केलं आहे.

17:50 (IST) 25 Nov 2024

IPL Live Updates: शुभम दुबे

२० लाखांच्या मूळ किमतीसह असलेल्या शुभम दुबेसाठी आरसीबी, राजस्थानमध्ये बोली सुरू होती.अखेरीस ८० लाखमध्ये राजस्थानने शुभम दुबेला संघात सामील केलं.

17:04 (IST) 25 Nov 2024

IPL Live Updates: आरसीबीने भुवनेश्वर कुमारसाठी उघडली तिजोरी

Bhuvneshwar Kumar : आरसीबीने भुवनेश्वर कुमारसाठी उघडली तिजोरी, मूळ किमतीच्या दुप्पट किंमतीला केले खरेदी

16:53 (IST) 25 Nov 2024

IPL Auction 2025 Live : अनसोल्ड

कॅप्ड फिरकीपटूंच्या यादीतील खेळाडू विजयकांत वियासकांत, अकील हुसैन, केशव महाराज, आदिल रशीद अनसोल्ड राहिले.

16:50 (IST) 25 Nov 2024
IPL Auction 2025 Live :अल्लाह गझनफर

अफगाणिस्तानचा फिरकीपटू अल्लाह गझनफरवर कोलकाता आणि आरसीबीने बोली लावली. यानंतर मुंबई इंडियन्सने या बोलीमध्ये सहभाग घेतला. अखेरीस मुंबईने गझनफरला ४.८० कोटींना संघात सामील केलं.

16:48 (IST) 25 Nov 2024

IPL Auction 2025 Live : कॅप्ड फिरकीपटूंची यादी

कॅप्ड फिरकीपटूंच्या यादीत मुजीब उर रहमान अनसोल्ड, तर दुसरा फिरकीपटू अल्लाह गझनफरवर बोली लावली जात आहे.

16:46 (IST) 25 Nov 2024

IPL Auction 2025 Live : लॉकी फर्ग्युसन

लॉकी फर्ग्युसनला २ कोटींच्या मूळ किमतीला पंजाब किंग्स संघाने ताफ्यात सामील केलं.

16:45 (IST) 25 Nov 2024

IPL Auction 2025 Live : आकाशदीप

आकाशदीप २ कोटींच्या मूळ किमतीसह लिलावात उतरला होता. आकाशदीपसाठी चेन्नई आणि लखनौमध्ये बोलींचा मुकाबला सुरू होता. अखेरीस लखनौ संघाने आकाशदीपला ८ कोटींना संघात सामील केलं आहे.

16:38 (IST) 25 Nov 2024

IPL Auction 2025 Live : दीपक चहर

मुंबई इंडियन्सने दीपक चहरला संघात सामील करून घेण्यासाठी शेवटपर्यंत बोली लावली. पंजाब आणि मुंबईत मुकाबला सुरू होता. ८ कोटींवर बोली गेल्यानंतर पंजाबने माघार घेतली. यानंतर चेन्नईने बोली लावली. पण अखेरीस मुंबईने बाजी मारत दीपक चहरला ९.२५ कोटींना मुंबईत घेतलं.

16:35 (IST) 25 Nov 2024

IPL Auction 2025 Live : मुकेश कुमार

२ कोटींच्या मूळ किमतीसह लिलावात उतरलेल्या मुकेश कुमारवर चेन्नईने बोली लावली. यानंतर पंजाबने बोली लावण्यास सुरूवात केली. दोन्ही संघांच्या बोलीसह किंमत ६.५० कोटींवर पोहोचली. त्यानंतर दिल्लीने आरटीएमची इच्छा दाखवली. पंजाबने ८ कोटींची बोली लावली आणि तरीही दिल्लीने त्याला आरटीएम करत संघात कायम ठेवले.

16:27 (IST) 25 Nov 2024

IPL Auction 2025 Live : भुवनेश्वर कुमार आरसीबीत दाखल

भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. आरसीबीने भुवनेश्वरला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले. लखनौनेही आरसीबीमध्ये स्वारस्य दाखवले होते, परंतु आरसीबीने यशस्वी बोली लावली.

16:26 (IST) 25 Nov 2024

IPL Auction 2025 Live : गेराल्ड कोएत्झीला गुजरात टायटन्सने 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीची मूळ किंमत 1.25 कोटी रुपये होती. त्याला गुजरात टायटन्सने 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले.

16:25 (IST) 25 Nov 2024

IPL Auction 2025 Live : राजस्थान रॉयल्सने तुषार देशपांडेला 6.50 कोटींना खरेदी केले

तुषार देशपांडे मूळ किंमत एक कोटी रुपये घेऊन मैदानात उतरला. त्यांच्यासाठी राजस्थान आणि सीएसके यांच्यात स्पर्धा होती. अखेर राजस्थानने तुषारला 6.50 कोटींना खरेदी केले. CSK ने त्याच्यासाठी RTM चा वापर केला नाही.

IPL Mega Auction 2025 Day 2 Highlights: आयपीएल २०२५ चा लिलाव पार पडला असून दुसऱ्या दिवशी कोणत्या खेळाडूंवर बोली लागली, वाचा