सर्वसामान्य नागरिकांचा थेट संबंध येणारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा खाते नेहमीच टीकेचे लक्ष्य ठरले आहे. खात्यावर होणाऱ्या भ्रष्टाचाराचा, गैरप्रकाराच्या आरोपांची दखल घेऊन सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता येण्यासाठी विभागीय पुरवठा खात्याने शिधापत्रिकांचे संगणकीकरण सुरू केले असून ८६ टक्के संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
विविध योजना ‘ऑनलाईन’ करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्य आणि केंद्र शासनाने शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याची योजना सुरू केली. या संगणकीकरण कामात विभागीय पुरवठा खात्याने केलेली कामगिरी लक्षणीय ठरली असून ८६ टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले असून जवळपास २० लाखाच्यावर शिधापत्रिकांचे संगणकीकरण झाले आहे. संगणकीकृत शिधापत्रिकेमुळे वितरण प्रणालीत पारदर्शकता येईल. शिवाय ग्राहकांच्या खात्यात अनुदान सरळ जमा करण्याच्या कामातही याची मदत होणार आहे.
आतापर्यंत संगणकीकरण झालेल्या नागपूर विभागात नागपूर शहराची ९५ टक्केवारी असल्याची माहिती पुरवठा खात्याचे उपायुक्त आर. एस. मावस्कर यांनी सांगितले. २३ लाख ११ हजार ९८८ शिधाकार्ड नागपूर जिल्ह्य़ात सहा विभागांमध्ये तयार आहेत. त्यापैकी २० लाख ४ हजार १९९ शिधापत्रिकांची नोंद करण्यात आली आहे. ५० टक्के काम गडचिरोलीसारख्या मागास भागात पूर्ण झाले आहे.
जिल्ह्य़ाचे नाव शिधापत्रिकांची संख्या संगणकीकृत शिधापत्रिका टक्केवारी
नागपूर शहर ४९४६३१ ४७१९५२ ९५.४१
नागपूर ग्रामीण ४१६८५३ ३९७२३३ ९५.२९
वर्धा २६८३९५ २५९२९८ ९६.६१
भंडारा २४७४१९ १९६२४७ ७९.३३
गोंदिया २५०८७६ २३१७२३ ९२.३७
चंद्रपूर ४३२९४० ३४६३६७ ८०.००
गडचिरोली २००८७४ १०१३५१ ५०.४६
संग्रहित लेख, दिनांक 21st Jan 2013 रोजी प्रकाशित
सार्वजनिक वितरण प्रणालीचे ८६ टक्के संगणकीकरण पूर्ण
सर्वसामान्य नागरिकांचा थेट संबंध येणारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा खाते नेहमीच टीकेचे लक्ष्य ठरले आहे. खात्यावर होणाऱ्या भ्रष्टाचाराचा, गैरप्रकाराच्या आरोपांची दखल घेऊन सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता येण्यासाठी विभागीय पुरवठा खात्याने शिधापत्रिकांचे संगणकीकरण सुरू केले असून ८६ टक्के संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 21-01-2013 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 86 computerization complete in public destribution system