दाट जंगलाच्या परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यानंतर शोधमोहिम हाती घेण्यात आली होती. तिचे नेतृत्त्व कर्नल संतोष महाडिक करीत होते. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तेथे त्यांना वीरगती प्राप्त झाली. महाडिक यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात झाले. १९९८ मध्ये ते लष्करात विशेष दलात दाखल झाले आणि अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना सेना पदकाने गौरविण्यात आले होते.
संग्रहित लेख, दिनांक 18th Nov 2015 रोजी प्रकाशित
साताऱ्याचे कर्नल संतोष महाडिक कुपवाडामध्ये शहीद, आज अंत्यसंस्कार
महाडिक हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी गावचे रहिवासी आहेत.
Written by विश्वनाथ गरुड
Updated:

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 18-11-2015 at 10:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army colonel from satara falls to militants bullets in kashmir