अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कुणाला संधी मिळाली आहे हे स्पष्ट झालं आहे. शिंदे गटातून नऊजण आणि भाजपातून नऊजण असे एकूण १८ मंत्री या मंत्रीमंडळ विस्तारात शपथ घेणार आहेत. भाजपाकडून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह अनेक ज्येष्ठ नेत्यांना संधी मिळाली आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांसह नऊजणांना संधी मिळाली आहे. मागील अनेक दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याची चर्चा रंगली होती. विरोधी पक्षनेते अजित पवारांसह महाविकासआघाडीच्या अनेक नेत्यांनी रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली होती. दिल्लीतून मान्यता मिळाल्याशिवाय मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. त्यामुळेच दोघांच्याही दिल्ली वाऱ्या सुरू असल्याचा खोटक टोलाही लगावण्यात आला होता. मात्र, अखेर आज (९ ऑगस्ट) मंत्रीमंडळ विस्तार झाला. भाजपातून मंत्रिमंडळात कुणाला संधी? १. चंद्रकांत पाटील२. गिरीश महाजन३. सुधीर मुनगंटीवार४. राधाकृष्ण विखे पाटील५. मंगलप्रभात लोढा६. सुरेश खाडे७. रविंद्र चव्हाण८. अतुल सावे९. विजयकुमार गावित शिंदे गटातून मंत्रिमंडळात कुणाला संधी? १. दीपक केसरकर२. दादा भुसे३. उदय सामंत४. संदीपान भुमरे५. तानाजी सावंत६. शंभुराजे देसाई७. गुलाबराव पाटील८. अब्दुल सत्तार९. संजय राठोड हेही वाचा : Maharashtra Cabinet Expansion Live: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, शपथविधीला सुरुवात मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार हे स्पष्ट झालं असलं तरी यातील कुणाला कॅबिनेट मंत्रीपद मिळतं आणि कोण राज्यमंत्री म्हणून शपथ घेतं हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.