बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथील पॅराकमांडो निखील श्रावण बुरांडे (२५) यांने आज गुरुवारी आग्रा येथे राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
निखिल तीन वर्षांपूर्वी सैन्यात दाखल झाला होता, तो आग्रा येथे कार्यरत होता व आग्रा सैन्य कॅन्टोन्मेंट परिवारात निखिल राहत होता. निखिलने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याच कारण सध्या अस्पष्ट आहे.
निखिलचा मृतदेह दिल्लीवरून आज (गुरूवार) रात्री नागपूरला आणला जाणार असून, इथून तो बल्लारपूर तालुक्यातील मानोरा या त्याच्या गावी आणला जाणार आहे. उद्या (शुक्रवार) निखिलवर अंत्यसंस्कार होणार आहेत.
First published on: 18-03-2021 at 22:13 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paracommando nikhil burande from ballarpur commits suicide at agra msr