राघव चड्ढा यांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओला परिणीती चोप्राने केलं लाइक; नेटकरी म्हणाले “लग्नाची तारीख…”

परिणीती व राघव चड्ढा यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

parineeti chopra raghav chadha news
परिणीती चोप्रा-राघव चड्ढा. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. परिणीतीला आम आदमी पार्टीचे(आप) खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर स्पॉट करण्यात आलं होतं. त्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर परिणीती व राघव चड्ढा यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगल्या होत्या.

आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करत परिणीती व राघव चड्ढा यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. परिणीती व राघव चड्ढा यांचा फोटो ट्वीट करत “राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हा दोघांचं नातं प्रेम, आनंद व सहवासाने भरलेलं असावं. माझ्या खूप शुभेच्छा” असं खासदार संजीव अरोरा म्हणाले होते. त्यानंतर परिणीती व राघव चड्ढा यांच्या लग्नाबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता परिणीतीने राघव चड्ढा यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ लाइक केला आहे.

हेही वाचा>> “मी संसार टिकवण्यासाठी १०० टक्के प्रयत्न केले, पण…” समांथा रुथ प्रभूचं वक्तव्य, म्हणाली “नागाचैत्यनबरोबर घटस्फोट घेण्याचा…”

हेही वाचा>> आत्महत्येच्या तीन दिवसांनी आकांक्षा दुबेचा शवविच्छेदन अहवाल समोर, बॉयफ्रेंड समर सिंहवर अटकेची टांगती तलवार

राघव चड्ढा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर प्रचारादरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला परिणीती चोप्राने लाइक केल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “दिख रही है आपकी नीती, राजनीती वाली” असं एकाने म्हटलं आहे. तर एकाने “सगळं काही परिणीतीसाठी होत आहे”, अशी कमेंट केली आहे. “बॉलिवूड वाइब” असंही एकाने म्हटलं आहे.

“लवकर लग्न करा सर, तुमच्या दोघांची जोडी खूप छान दिसते” अशी कमेंट एकाने केली आहे.

“लग्नाची तारीख सांगा चड्ढा साहेब” असं एकाने म्हटलं आहे. “काय व्यक्तिमत्व आहे. परिणीतीची पसंत चांगली आहे”, अशी कमेंटही केली आहे. “राजनीती ते परिणीतीपर्यंतचा प्रवास”, असंही एकाने म्हटलं आहे.

परिणीती व राघव चड्ढा यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ‘लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स’मध्ये शिक्षण घेताना परिणीती व राघव चड्ढा यांची ओळख झाली. तेव्हापासून ते मित्र आहेत. इन्स्टाग्रामवरही ते एकमेकांना फॉलो करतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 13:36 IST
Next Story
वहिनी असावी तर अशी! सनी कौशलच्या वाढदिवशी कतरीनाने दिलं होत मोठं गिफ्ट; खुद्द अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा
Exit mobile version