scorecardresearch

आत्महत्येच्या तीन दिवसांनी आकांक्षा दुबेचा शवविच्छेदन अहवाल समोर, बॉयफ्रेंड समर सिंहवर अटकेची टांगती तलवार

भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने रविवारी(२६ मार्च) गळफास घेत आत्महत्या केली.

akanksha dubey postmortem report
आकांक्षा दुबेचा शवविच्छेदन अहवाल समोर. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

प्रसिद्ध भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने रविवारी(२६ मार्च) गळफास घेत आत्महत्या केली. आकांक्षाने वाराणसीमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या करत जीवन संपवलं. २५ वर्षीय आकांक्षाच्या आत्महत्येने भोजपूरी इंडस्ट्रीत खळखळ माजली आहे. आत्महत्या केल्यानंतर आकांक्षाता मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे.

आकांक्षाच्या शवविच्छेदन अहवालात अभिनेत्रीचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं म्हटलं गेलं आहे. आकांक्षाच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या खुणा आढळलेल्या नाहीत. त्यामुळे आकांक्षाचा खून नसून तिचा मृत्यू गळफास घेऊनच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. परंतु, आकांक्षाचा बॉयफ्रेंड समर सिंहमुळे तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा>> करीना कपूरचं उर्फी जावेदबाबत वक्तव्य, कौतुक करत म्हणाली “ती खूप हुशार आणि…”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा भोजपुरी अभिनेता व गायक समर सिंहबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. ते दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. समर सिंहने ब्रेकअप केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. समर सिंहने ब्रेकअप केल्यानंतर नैराश्यात येऊन आकांक्षाने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यामुळे आकांक्षाचा बॉयफ्रेंड समर सिंहवर अटकेची टांगती तलवार आहे.

हेही वाचा>> “समर सिंह आणि त्याच्या भावाने हत्या केली” २५व्या वर्षी आत्महत्या केलेल्या आकांक्षा दुबेच्या आईचे गायकावर गंभीर आरोप, म्हणाल्या “त्याने २१ मार्चला…”

आकांक्षाच्या आईने समर सिंह व त्याचा भाऊ संजय सिंहविरोधात गुन्हा दाखल केला होता. अभिनेत्रीच्या हत्येचा आरोप तिच्या आईने केला होता. याप्रकरणी पोलीस समर सिंहची अधिक चौकशी करणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 17:36 IST

संबंधित बातम्या