Khushboo Tawde Baby Shower : अभिनेत्री खुशबू तावडेच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. खुशबू दुसऱ्यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी खुशबूने ही आनंदाची बातमी जाहीर केली. याआधी २ नोव्हेंबर २०२१मध्ये खुशबूला मुलगा झाला होता. ज्याचं नाव राघव असून तो ३ वर्षांचा आहे. त्यानंतर आता खुशबू व संग्राम साळवीच्या घरी दुसऱ्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. जुलै महिन्यात खुशबूचं डोहाळे जेवण पार पडलं. याचा व्हिडीओ नुकताच खुशबूची बहीण अभिनेत्री तितीक्षा तावडेने शेअर केला आहे.

अभिनेत्री तितीक्षा तावडेने तिच्या युट्यूब चॅनलवर खुशबूच्या ( Khushboo Tawde ) डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर केला आला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला तितीक्षा, सिद्धार्थ बोडके आपल्या कुटुंबाबरोबर तितीक्षाच्या डोहाळे जेवणाची तयारी करताना दिसत आहेत. खुशबूचे आवडते पदार्थ आणि तिला पहिल्या गरोदरपणात ज्या पदार्थाचे डोहाळे लागले होते. ते सर्व पदार्थ दुसऱ्या डोहाळे जेवणात ठेवण्यात आल्याचं तितीक्षाने सांगितलं. घरीच साध्या पद्धतीने आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत खुशबूचं डोहाळे जेवण झालं.

हेही वाचा- Video: ‘पारू’ फेम शरयू सोनावणेने हलगीवर धरला ठेका, डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस, म्हणाले, “शब्दच नाही..”

खुशबूच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला पती संग्राम साळवी दिसला नाही. कारण ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील चित्रीकरणाचा संग्रामचा पहिला दिवस होता. त्यामुळे त्याने व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून खुशबूच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी मुलगा की मुलगी हा ओळखायचा खेळ घेतला. तेव्हा खुशबू व संग्रामने पेढ्याची वाटी उघडली. आता यावरून खुशबू पुन्हा एकदा गोंडस चिमुकल्याला जन्म देणार का? याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा – “खड्डे भेदभाव करत नाहीत”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्याचा व्हिडीओ शेअर करत विवेक अग्निहोत्रींचे विधान, म्हणाले…

हेही वाचा – Video: श्रीदेवींच्या जयंतीनिमित्ताने लेक जान्हवी कपूरने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, बॉयफ्रेंडसह नतमस्तक होऊन घेतले आशीर्वाद

खुशबू तावडेने सोडली ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका

दरम्यान, खुशबू तावडेने ( Khushboo Tawde ) गरोदर असल्यामुळे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका काही दिवसांपूर्वी सोडली. यावेळी मालिकेतील कलाकारांनी तिचा शेवटचा दिवस साजरा केला. केक कापून आणि भेटवस्तू देऊन ‘सारं काही तिच्यासाठी’मधील कलाकारांनी खुशबूला निरोप दिला. आता ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील साधीसरळ असणारी उमाईच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी वैद्य पाहायला मिळत आहे. खुशबूने उमाईची भूमिका एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे.