Premium

“तुझा बॉयफ्रेंड कोण आहे?” अखेर सारा अली खानने दिलं उत्तर, म्हणाली…

गेल्या काही दिवसांपासून सारा क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

sara bf

अभिनेत्री सारा अली खान आणि विकी कौशल हे सध्या त्यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. तीन दिवसांपूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो चित्रपट गृहात चांगली कामगिरी करताना दिसत आहे. गेले अनेक दिवस विकी आणि सारा या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत होते. तर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विकी आणि सारा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये गेले असताना कपिलने साराला तिच्या बॉयफ्रेंडचं नाव विचारलं. तर यावर साराने दिलेलं उत्तर लक्ष वेधून घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री सारा अली खान ही बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून सारा क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तर आता या सगळ्याबद्दल साराने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये जबरदस्त उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा : Video: …अन् सारा अली खान रितेश देशमुखशी चक्क मराठीत बोलू लागली, व्हिडीओ व्हायरल

नुकतेच हे दोघं ‘कपिल शर्मा शो’मध्ये सहभागी झाली होते. यावेळी कपिल आणि त्या दोघांनी मिळून भरभरून गप्पा मारल्या. त्या तिघांचा मजेशीर अंदाज प्रेक्षकांना चांगलाच आवडला. या गप्पा रंगल्या असतानाच कपिलने साराला विचारलं, “सारा, आता सांगूनच टाक. तुझा बॉयफ्रेंड कोण आहे? तो फिल्म इंडस्ट्री मधीलच आहे का?” कपिल असा काही प्रश्न विचारेल असा साराला अजिबात अंदाज नव्हता. साराने या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही. साराने या प्रश्नाचे उत्तर दिलं नाही म्हणून कपिल म्हणाला की, “आम्ही फक्त बाण मारत आहोत. कोणास ठाऊक कधी निशाणा लागेल!” तर यावर सारा म्हणाली, “हो पण आजकाल माझा एकही बाण निशाण्यावर लागत नाही.”

हेही वाचा : “… त्यापेक्षा हिंदू हो,” महाकाल मंदिरात गेल्यामुळे सारा अली खान ट्रोल

दरम्यान, विकी आणि साराच्या या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने तीन दिवसातच २२.५९ कोटींची कमाई केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sara ali khan gave answer to kapil sharma about her relationship status rnv