scorecardresearch

Premium

“… त्यापेक्षा हिंदू हो,” महाकाल मंदिरात गेल्यामुळे सारा अली खान ट्रोल

सारा ही विकी कौशलबरोबर उज्जैनच्या शिवमंदिरात दर्शनासाठी गेली आणि भस्म आरतीमध्येही सहभागी झाली.

sara troll

अभिनेत्री सारा अली खान ही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलीच चर्चेत असते. लवकरच ती ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ह चित्रपट यशस्वी व्हावा यासाठी ती काल महाकाल मंदिरात गेली. पण आता मंदिरात जाण्यावरून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात सारा अली खानबरोबर अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. गेले अनेक दिवस ते दोघं या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. अशातच हे दोघं उज्जैनच्या शिवमंदिरात दर्शनासाठी गेले. या दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सारानेही या वेळचा एक फोटो पोस्ट केला आहे. मात्र ती त्यावरून आता ट्रोल होऊ लागली आहे.

Akshara Mangalsutra
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये रंगणार राजेशाही विवाह सोहळा, अक्षराने घातलेल्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधलं लक्ष
mugdha prathamesh
प्रथमेश लघाटे मुग्धा वैशंपायनला ‘या’ नावाने मारतो हाक, गायकाने शेअर केलेल्या स्टोरीने वेधलं लक्ष
Ganpati visarjan 2023 indian army soldiers celebrate Ganesh Visarjan at ladakh leh siachen base camp
Video: सियाचिन सीमेवर भारतीय जवानांनी गणरायाला दिला निरोप; जवानांनी गुलाल उधळत लेझीम अन् मराठमोळ्या गाण्यांवर धरला ठेका
raghav-chadha-and-parineeti-chopra
लीला पॅलेसमध्ये परिणीती-राघवसाठी बुक करण्यात आला आलिशान महाराजा सुट, एका रात्रीचं भाडं तब्बल…

आणखी वाचा : Video: …अन् सारा अली खान रितेश देशमुखशी चक्क मराठीत बोलू लागली, व्हिडीओ व्हायरल

साराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये सारा आणि विकी गाभाऱ्यात हात जोडून बसलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करीत तिने लिहिलं, “जय भोलेनाथ.” तर व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओमध्ये भस्म आरतीमध्ये सहभागी होताना दिसत आहे आणि शंकराच्या भक्तीत मग्न असल्याचं दिसत आहे. पण तिचं मंदिरात जाणं काही नेटकऱ्यांना आवडलं नाही आणि त्यांनी साराला ट्रोल करायला सुरुवात केली.

हेही वाचा : “मी तुझं मत विचारलेलं नाही…” भर मुलाखतीत शर्मिला टागोर व नात सारा आली खान यांच्यात वाद

साराच्या या पोस्टवर कमेंट करत एकाने लिहिलं, “तुम्ही हिंदू देवतांची पूजा का करता? जर तुम्हाला तुमच्या अल्लाहने सांगितलं आहे की देव अस्तित्वातच नाही.” दुसरा नेटकरी म्हणाला, “लाज वाटते तुझी.” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “तुझ्या मुस्लीम असण्याचा काही फायदा नाही, जर तू देवाची भक्ती करत बसलीस तर. त्यापेक्षा हिंदूच हो.” तर आणखी एक जण म्हणाला, “तुझं नाव बदलून टाक.” तर एका नेटकऱ्याने “तुझे वडील मुस्लीम असून मंदिरात पूजा करतात. मला लाज वाटते, तुझं चांगलं संगोपन व्हावं अशी माझी इच्छा आहे,” असं म्हणत साराबरोबरच सैफ अली खानलाही लक्ष्य केले. मंदिरात जाण्यावरून किंवा देवाची पूजा करण्यावरून सारा अली खान ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिला या मुद्द्यावरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actres sara ali khan gets troll for visiting mahakal temple in ujjain rnv

First published on: 31-05-2023 at 12:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×