केंद्र शासनाच्या ‘अमृत’ (अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन) या अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला असून राज्यातील ४३ शहरांचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे.
शहरातील प्रत्येक घरासाठी निकषानुसार पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, मलनिस्सारण, मलव्यवस्थापन आणि पर्जन्यजल वाहिन्या अशी व्यवस्था उभी करणे. शहरातील मोकळ्या जागा, हरित क्षेत्रे व परिवहन व्यवस्थेत सुधारणा करून प्रदूषण कमी करणे आणि अन्य सुविधा उभारणे, यासाठी हे अभियान केंद्र सरकारने सुरू केले आहे. देशातील ५०० शहरांमध्ये ते राबविण्यात येणार आहे. या शहरात २०१५-१६ ते १९-२० या पाच वर्षांच्या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे. केंद्राकडून एक हजार तीन कोटी रुपये दिले जाणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभियानासाठी शहरे
ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाइंदर, नवी मुंबई, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, मालेगाव, जळगाव, भुसावळ, सोलापूर, बार्शी, कोल्हापूर, इचलकरंजी, लातूर, उदगीर, अमरावती, अचलपूर, वर्धा, िहगणघाट, सातारा, सांगली-मिरज, औरंगाबाद,नगर, परभणी, जालना, नांदेड-वाघाळा, बीड, अकोला, धुळे, चंद्रपूर, पनवेल, गोंदिया, यवतमाळ, उस्मानाबाद, नंदुरबार, नागपूर.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government to implement central amrut scheme in 43 city