बंदी असूनही घोडागाडी चालविणाऱ्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई करून ७ घोडागाडय़ा जप्त केल्या आहेत. पीपल फॉर अ‍ॅनिमल या संस्थेच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली.  मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी महिन्यात व्हिक्टोरिया आणि घोडागाडय़ांवर बंदी घातली होती. मात्र हे आदेश झुगारून दक्षिण मुंबईत घोडागाडय़ा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पीपल फॉर अ‍ॅनिमल संस्थेने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत ७ घोडागाडय़ा जप्त केल्या आहेत.  यापैकी एका जखमी घोडय़ावर उपचारही सुरू आहेत. या घोडागाडी चालकांकडे पालिकेचा परवाना नसल्याचेही आढळून आले आहे. दरम्यान, घोडागाडय़ांविरोधात कारवाई केल्यामुळे घोडागाडी मालकांमध्ये नाराजी पसरली  आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police action on ban victoria