काही अपवाद वगळता मुंबईतील बहुतांश रेल्वेस्थानके प्रवाशांनी सदैव गजबजलेली असतात. त्यातही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेलेली असते. या गर्दीतील प्रत्येकालाच आपल्या कामाच्या ठिकाणी वा घरी वेळेत पोहोचण्याची घाई असते. पण स्थानकातील एका फलाटावरून दुसऱ्या फलाटाकडे नेणारे पूल गर्दीने वाहत असल्याने अनेक प्रवासी रूळ ओलांडण्याचा ‘शॉर्टकट’ वापरतात. हा मार्ग प्रवाशांचा वेळ वाचवतो, पण वेळ गाठण्याच्या फंदात अशा प्रवाशांची मृत्यूशी गाठ पडू शकते. एका गाडीतून दुसऱ्या गाडीत चढणे, रूळ ओलांडणे, दारावर लोंबकळणे, टपावरून प्रवास करणे अशा युक्त्यानिशी प्रवासी आपला प्रवास जलद करत असले तरी तो तितकाच धोकादायकही आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निर्मल हरिंद्रन

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Risky shortcuts