-
सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. बॉलीवूड सेलिब्रिटींनी सुद्धा व्यग्र शेड्युलमधून वेळ काढत आपल्या कुटुंबीयांसह दिवाळीचा सण साजरा केला. आलिया भट्टने याचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
आलिया भट्टने या फोटोंना ‘दिलवाली दिवाली’ असं कॅप्शन दिलं आहे. तसेच चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.
-
आलियाने दिवाळीच्या पहिल्या दिवशी बेबी पिंक रंगाचा ट्रान्सपेरंट चिकनकारी कुर्ता घातला होता.
-
केसात गजरा, गळ्यात नाजूक नेकलेस या लूकमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती.
-
आलियाच्या दिवाळी पार्टीला तिची सख्खी बहीण शाहीन भट्ट देखील उपस्थित होती.
-
याशिवाय आलियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या मित्रमंडळींसह दिग्दर्शक अयान मुखर्जीची सुद्धा झलक पाहायला मिळत आहे.
-
काही दिवसांपूर्वी आलियाने तिची ३ वर्षांची लेक राहाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदा आलियाने राहाचा फेस रिव्हिल न करता एक खास फोटो शेअर केला आहे.
-
यामध्ये चिमुकली राहा दिवाळीच्या पणत्या रंगवत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
विशेष म्हणजे राहाने रंगवलेल्या पणत्या रांगोळीजवळ ठेऊन कपूर कुटुंबीयांकडे सुंदर सजावट करण्यात आल्याचं आलियाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : आलिया भट्ट इन्स्टाग्राम )
३ वर्षांच्या राहाने रंगवल्या पणत्या! आलिया भट्टने शेअर केले फोटो, ‘असा’ साजरा केला दिवाळीचा पहिला दिवस
राहाने रंगवल्या दिवाळीच्या पणत्या, ‘त्या’ फोटोमध्ये दिसली झलक, आलिया भट्टच्या हटके लूकने वेधलं लक्ष
Web Title: Alia bhatt shares diwali celebration photo 3 year old raha painted diyas see beautiful photos sva 00