-
दिवसभरात हे पदार्थ खाल्ल्यास तुमचं वजन वाढू शकतं. खाली आम्ही अशा काही पदार्थांची यादी देत आहोत जे सामान्यतः दिवसभरात खाल्ले जातात, परंतु प्रत्यक्षात हे तुमच्या वजनवाढीला कारणीभूत ठरू शकतात. दिवसभरात खाल्ले जाणारे हे स्नॅक्स आणि जेवण गुपचूप अतिरिक्त कॅलोरी, साखर आणि चरबी वाढवून वजन वाढवू शकतात. (Photo Source : Unsplash)
-
फ्लेवर्ड योगर्ट (Flavoured Yogurt) : फ्लेवर्ड योगर्ट निरोगी आणि फिटनेस फ्रीक लोकांसाठी उत्तम वाटत असलं तरी त्यात अतिरिक्त साखर असते. त्याऐवजी साधे ग्रीक योगर्ट घ्या आणि त्यावर ताज्या फळांचे तुकडे ठेवा. (Photo Source : Unsplash)
-
ग्रॅनोला बार (Granola and Cereal Bars) : यामध्ये रोल केलेले ओट्स, नट, मध किंवा इतर गोड पदार्थ जसे की ब्राऊन शुगर, आणि कधीकधी पफ राइस, जे सहसा कुरकुरीत, टोस्टेड आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजलेले असतात ही सामग्री एकत्र केलेली असते. या सगळ्याच्या मिश्रणातून तयारी केलेली एक प्रकारची चिक्की असते. ऊर्जा देणारा व पौष्टिक पदार्थ म्हणून जगभर याचा प्रचार केला जातो. परंतु, यामध्ये कार्ब्स, साखर, व तेल असतं त्यामुळे ते चॉकलेट बारसारखंच असतं. ग्रॅनोला बार देखील वजन वाढवतात. (Photo Source : unsplash)
-
हेल्दी सलाद विथ ड्रेसिंग्स : सॉस, चीज आणि क्रूटन्ससह सलाद खाल्ल्याने तुमच्या कॅलरी इनटेकचे प्रमाण दुप्पट होऊ शकते. त्याऐवजी ऑलिव्ह ऑइल, लिंबू किंवा योगर्ट आधारित सॉस निवडा. (Photo Source : unsplash)
-
स्मूदीज आणि ज्यूस: स्टोअरमध्ये मिळणाऱ्या स्मूदीज आणि फळांच्या ज्यूसमध्ये सोड्यापेक्षा (कोक-पेप्सी) अधिक साखर असू शकते! यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि भूक लागण्याचे प्रमाण वाढते. त्याऐवजी घरगुती स्मूदीज आणि ज्यूस बनवा ज्यात अतिरिक्त साखर नसावी. (Photo Source : unsplash)
-
ट्रेल मिक्स : व्हाइट नट्स हेल्दी असतात. मात्र अनेक व्यावसायिक ट्रेल मिक्समध्ये चॉकलेटचे तुकडे, कँडीयुक्त फळे आणि जास्त मीठ असते, ज्यामुळे कॅलरी इन्टेक वाढतो. (Photo Source : unsplash)
-
पांढरे ब्रेड : रिफाइनड पांढऱ्या ब्रेडमध्ये फायबरची कमतरता असते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढते आणि लवकरच भूक लागते. चांगल्या तृप्ततेसाठी त्याऐवजी व्होल ग्रेन (पूर्णपणे धान्यापासून बनवलेले) किंवा मल्टीग्रेन ब्रेड घ्या. (Photo Source : unsplash)
दिवसा ‘हे’ पदार्थ खाल्ल्याने तुमचं वजन वाढू शकतं
दिवसभरात खाल्ले जाणारे हे स्नॅक्स आणि जेवण गुपचूप अतिरिक्त कॅलोरी, साखर आणि चरबी वाढवून वजन वाढवू शकतात.
Web Title: Eating these foods during day can secretly make you gain weight will cause unhealthy iehd import asc