[content_full]

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

थंडीच्या दिवसांत समुद्राकाठच्या एका दगडावर बेडूक निवांत ऊन खात बसला होता. कपारीच्या खालून वर येणाऱ्या खेकड्याच्या हालचालीमुळे बेडकाची तंद्री भंगली. “काय राव, तुम्ही कुठल्यातरी फटीबिटीत दडून बसता? कंजस्टेड नाही वाटत तुम्हाला?“ बेडकानं खेकड्याची खोडी काढली. “नाही. आम्ही पूर्वी मुंबईत होतो ना, त्यामुळे सवय आहे!“ खेकड्यानं बेडकाला उडवून लावलं. “अरारारारा. मुंबईत होता तुम्ही? म्हणजे किड्यामुंग्यांपेक्षा वाईट असणार तुमचं आयुष्य,“ असं म्हणून बेडकानं पुन्हा खेकड्याला डिवचलं. खेकडा शांत राहिला. आता तोही वर चढून आला होता आणि बेडकापासून लांबच, पण निवांतपणे ऊन खात बसला होता. “कसलं तुझं हे अंग? फताडे पाय, ह्या वेड्यावाकड्या नांग्या, खडबडीत पाठ, उलटे लटकवल्यासारखे दिसणारे डोळे…काय पाप केलं होतंस तू गेल्या जन्मी?“ बेडकाला आज स्वस्थ बसवतच नव्हतं. खेकड्यानं तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. बेडकानं मग खेकड्याच्या अख्ख्या खानदानाचा उद्धार केला. आता मात्र खेकड्याला राहवलं नाही. “माझ्या नांग्या हे माझं शस्त्र आहे. ह्या फताड्या पायांनी तुझ्यापेक्षा वेगानं मी पळू शकतो, कपारीत कुठेही दडू शकतो,“ असं सांगून खेकड्यानं शेखी मिरवली. “माझ्यासारखं पाण्यात सूर मारून पोहता येतं का तुला? पाण्यात श्वास घेता येतो? लांब उडी मारता येते? काय उपयोग तुझा?“ बेडकानं पुन्हा खेकड्याला खिजवलं आणि खेकड्याला काय बोलावं सुचेना. “माझा लोक अन्न म्हणूनही उपयोग करतात. कॅल्शियम असतं माझ्या अंगात!“ खेकडा बोलून गेला. त्याचवेळी कुणीतरी त्याला अलगद उचललं, त्याच्या नांग्या मोडल्या आणि पिशवीत टाकलं. ते बघून बेडूक छद्मी हसला. `आलाय मोठा उपयोग सांगणारा! आपल्या कर्मानं मरणं म्हणतात, ते हे!` असं म्हणून बेडकानं छद्मी हास्य केलं. तेवढ्यात वरून आलेल्या एका मोठ्या पक्ष्यानं बेडकाला अलगद उचललं आणि तो उंच झाडावरच्या आपल्या घरट्याकडे झेपावला.

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • खेकडे  २
  • चिरलेले कांदे ३
  • लसूण १५ ते १६ पाकळ्या
  • खोबऱ्याचं वाटण १ वाटी
  • तेल ४ ते ५ चमचे.
  • लाल तिखट ४ चमचे
  • बेसन २ चमचे
  • हळत अर्धा चमचा
  • हिंग अर्धा चमचा
  • मीठ
  • कांद्याची पात
  • कोथिंबीर
  • कोबी

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • प्रथम खेकड्याची वाटी पूर्णपणे काढून ती साफ करून घ्यावी.
  • बाऊलमध्ये खोबऱ्याचं वाटण, लाल तिखट, हळद, बेसन, हिंग, मीठ घालून मिक्स करून घ्यावं.
  • हे मिश्रण खेकड्याच्या वाटीत भरावं.
  • कढईत तेल गरम करून त्यात लसणाच्या पाकळ्या, चिरलेला कांदा घालून व्यवस्थित परतून घ्यावं.
  • नंतर त्यात हिंग, हळद घालून कांदा लालसर होईपर्यंत परतावा.
  • त्यात भरलेले खेकडे घालावेत.
  • उरलेली पेस्ट आणि पाणी घालून, मिक्स करून त्यावर झाकण ठेवावं.
  • झाकणावर पाणी घालून हे मिश्रण दहा मिनिटं शिजू द्यावं.
  • खेकडे शिजल्यानंतर झाकणावरचं पाणी त्या मिश्रणात ओतून पुन्हा १० मिनिटे शिजू द्यावं.
  • वरून कोथिंबीर, कांद्याची पात आणि कोबी यांची सजावट करून ही डिश सर्व्ह करावी.

[/one_third]

[/row]

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make crab bharta fry maharashtrian recipe