Shev Bhaji Recipe: कधी कधी मुलांच्या डब्यासाठी नक्की काय बनवायचं असा प्रश्न पडतो. त्याच त्याच भाज्या खाऊनही मुलं कंटाळतात अशा वेळी तुम्ही चविष्ट आणि झणझणीत सुकी शेव भाजी नक्की ट्राय करा. चला तर मग जाणून घेऊया सुकी शेव भाजी बनवण्याची रेसिपी…
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
सुकी शेव भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- २ वाटी बारीक शेव
- १ कांदा बारीक चिरलेला
- १ टोमॅटो बारीक चिरलेला
- १ चमचा लाल तिखट
- ७-८ कढीपत्त्याची पाने
- १/२ वाटी कोथिंबीर
- मीठ चवीनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
सुकी शेव भाजी बनवण्याची कृती:
हेही वाचा: हिवाळा स्पेशल मिक्स भाजी; सर्वांना आवडणारी झटपट आणि मस्त रेसिपी नक्की ट्राय करा
- सर्वप्रथम गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा.
- आता तापलेल्या कढईत तेल घालून त्यात जिरे, मोहरी घाला.
- त्यानंतर त्यात कांदा, टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यावा.
- आता त्यात कढीपत्ता, लाल तिखट आणि मीठ घाला.
- त्यानंतर त्यात बारीक शेव घालून सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्या.
- या मिश्रणावर पाणी शिंपडा आणि त्यावर कोथिंबीर घालून दोन मिनिटांसाठी झाकूण ठेवा.
- दोन मिनिटांनंतर गॅस बंद करून तयार गरमागरम सुकी शेव भाजी झटपट सर्व्ह करा.
First published on: 20-11-2024 at 21:21 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make crispy dry shev bhaji in just 10 minutes make sure to try this great recipe sap