आजपासून या राशींचं नशीब फळफळणार! नवपंचम राजयोग देणार बक्कळ पैसा; उत्पन्नात वाढ तर…
13 September Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार, ग्रहांचा सेनापती म्हणून मंगळ ग्रहाला विशेष मान दिला जातो. तो साधारणपणे एका राशीत ४५ दिवस राहतो. सध्या मंगळ कन्या राशीत होता, पण १३ सप्टेंबर म्हणजे आज तो कन्या राशीतून निघून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राची रास असल्यामुळे तूळ राशीत मंगळ आल्याने काही राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तसेच, मंगळ आणि मिथुन राशीत असलेल्या गुरु बृहस्पतीच्या संयोगाने नवपंचम राजयोग तयार होत आहे.