११ ऑगस्टपासून ‘या’ राशींचे चांगले दिवस सुरू! करिअरमध्ये यश तर प्रेमसंबंधांमध्ये जवळीक
August Horoscope: बुद्धी, वाणी आणि व्यवहाराचा कारक बुध ग्रह आहे. ११ ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी १२:५९ पासून बुध ग्रह कर्क राशीत मार्गी होईल. कर्क ही एक जलतत्त्वाची रास आहे आणि तिचा स्वामी चंद्र आहे.
बुध मार्गी झाल्याने ६ राशींमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. ज्यांच्या कुंडलीत बुध किंवा कर्क महत्वाची भूमिका बजावत आहेत, त्यांच्यावर याचा खास प्रभाव होईल. चला जाणून घेऊया कर्क राशीत बुध मार्गी झाल्यामुळे राशींवर होणारे सकारात्मक परिणाम.