१७ ऑगस्टपर्यंत ‘या’ ३ राशीच्या लोकांचा पैसा वाढेल! बुधादित्य योग करेल धनाचा वर्षाव…
August Horoscope: ऑगस्ट महिन्याची सुरुवात बुधादित्य राजयोगाने होत आहे. सूर्य आणि बुध एकत्र कर्क राशीत आहेत. सूर्य-बुध यांचे हे योग पुढचे १७ दिवस ३ राशींच्या लोकांना भरपूर पैसा देणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार १६ जुलैला सूर्य गोचर करून कर्क राशीत आले आहेत. त्यानंतर बुध ग्रहही कर्क राशीत आला आहे. सूर्य आणि बुध यांच्या एकत्र येण्याने बुधादित्य योग तयार होतो, जो सध्या कर्क राशीत आहे.