उद्याच्या देवउठणी एकादशीला दुर्मिळ योग! भगवान विष्णू ‘या’ ३ राशींवर करतील कृपा…
1 November Horoscope: कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवउठणी एकादशी म्हणतात. या दिवशी सृष्टीचे पालन करणारे श्री विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. यानंतर शुभ आणि मंगल कामांची सुरुवात होते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि सुख-समृद्धी, धन आणि वैभव मिळते. या वर्षी देवउठणी एकादशीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत.
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 