दिवाळीला जुनी झाडू फेकताय? घरी गरिबी येऊ शकते अन् होऊ शकतो वाईट परिणाम…
Dhanteras Broom Buying: हिंदू धर्मात दिवाळीला खूप पवित्र मानले जाते. हा सण फक्त प्रकाश आणि आनंदाचा नाही, तर लक्ष्मीमातेच्या स्वागताचा दिवस आहे. दिवाळीच्या आधी लोक घराची साफसफाई, रंगरंगोटी आणि सजावट याकडे विशेष लक्ष देतात. दिवाळीचा हा शुभ सण धनत्रयोदशीपासून सुरू होऊन भाऊबीजपर्यंत पाच दिवस चालतो. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते- विशेषत: झाडूची खरेदी.