७२ तासांनी अखेर या राशींची सोनं अन् चांदी! गुरुदेव निर्माण करतील शक्तिशाली राजयोग
24 August Ardhakendra Yog: वैदिक ज्योतिषानुसार, नवग्रह काही काळानंतर आपली राशी बदलतात. त्याचा परिणाम १२ राशींवर तसेच देश-विदेशात दिसतो. देवतांचे गुरु वर्षातून एकदा राशी बदलतात. त्यामुळे कधी ना कधी त्यांची इतर ग्रहांबरोबर युती होते.
आता गुरुची युती ग्रहांचा राजा सूर्याबरोबर होत आहे, ज्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होत आहे. सध्या सूर्य सिंह राशीत आणि गुरु मिथुन राशीत आहेत. सूर्य-गुरु यांच्या या संयोगामुळे तयार झालेला अर्धकेंद्र योग काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात आनंद आणि चांगले परिणाम आणू शकतो.