‘या’ तारखेला जन्मलेले लोक सर्वांना आवडतात, बोलण्यात असतात हुशार…
Numerology Predictions: अंकशास्त्रात मूलांक माणसाच्या स्वभाव, विचारसरणी, गुण-दोष आणि जीवनाच्या प्रवासावर परिणाम करतो असे मानले जाते. मूलांक म्हणजे तुमच्या जन्मतारखेतील आकड्यांची बेरीज करून मिळणारा अंक.
उदाहरण : जर एखाद्याचा जन्म १५तारखेला झाला असेल, तर १ + ५ = ६ हा त्याचा मूलांक होतो. जर जन्म २४ तारखेला असेल, तर २ + ४ = ६ हा मूलांक मिळतो. म्हणजेच ज्या दिवशी तुमचा जन्म झाला, त्या तारखेतील आकड्यांची बेरीज करून जो एक अंकी अंक येतो, तो तुमचा मूलांक असतो. आज आपण मूलांक ६ असलेले लोक नेमके कसे असतात ते जाणून घेणार आहोत.