पितृपक्षात ‘या’ राशींना मिळेल पूर्वजांचा आशीर्वाद! अफाट पैसा, धनसंपत्ती अन् मोठं यश, तर…
Pitru Paksha Zodiac Signs: हिंदू धर्मात पितृपक्षाला खास महत्त्व आहे. पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो आणि आश्विन अमावास्येला म्हणजेच सर्वपितृ अमावास्येला संपतो. यावर्षी पितृपक्ष ७ सप्टेंबरला सुरू झाला असून २१ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. हा काळ पूर्वजांची आठवण काढण्याचा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. या काळात लोक श्राद्ध, तर्पण आणि दान-पुण्य करतात.