Raksha Bandhan: रक्षाबंधनाला दुहेरी योग! भावाला राखी बांधायची वेळ कोणती? वाचा, शुभ मुहूर्त
Raksha Bandhan Muhurat: हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्याची पौर्णिमा तिथी ८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून ४३ मिनिटांनी सुरू झाली आहे. ही तिथी ९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ वाजून २४ मिनिटांपर्यंत राहील. तर रात्री २ वाजून १५ मिनिटांपर्यंत सौभाग्य योग जुळून येईल. त्यामुळे उदया तिथीमुळे रक्षाबंधन ९ ऑगस्ट रोजी दिवसभर साजरा केला जाईल.