शनिदेवाची ‘या’ ४ राशींवर असते खास कृपा! गरीबालाही बनवतात श्रीमंत; मिळतो अफाट पैसा, मोठं यश
Shani Favourite Zodiac Signs: कर्मफळ देणारा शनी ग्रह नवग्रहांमध्ये सर्वात प्रभावशाली आणि महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनी हा सर्वात हळू चालणारा ग्रह आहे. तो एका राशीत सुमारे अडीच वर्ष राहतो. त्यामुळे एका राशीत परत यायला जवळपास ३० वर्षे लागतात. शनीला सर्वात क्रूर ग्रह मानले जाते कारण तो प्रत्येकाला त्यांच्या कर्मांनुसार फळ देतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीला दुःख, परिश्रम, अडथळे, आजार, दोष, विरोध, भीती, वार्धक्य, दान, आयुष्य, विकृत अवयव यांचा कारक मानले जाते.