शनीच्या साडेसातीचा ‘या’ ३ राशींवर होणार मोठा परिणाम! नोव्हेंबरनंतर पालटणार नशीब…
Shani Sadesati on Zodiac Signs: शनीदेव २८ नोव्हेंबर २०२५ रोजी मीन राशीत मार्गी होतील. शनीला न्याय आणि कर्माचा देव मानतात. सध्या शनी मीन राशीत आहेत. शनी एका राशीत साधारण अडीच वर्षे राहतात, त्यामुळे पुढच्या वर्षीही शनी मीन राशीत राहतील. या वर्षी शनी वक्री अवस्थेतून मार्गी होणार आहेत, म्हणजे शनी सरळ गतीने चालतील आणि ज्यांची साडेसाती सुरु आहे अशा राशींवर परिणाम करतील. सध्या शनी गुरुच्या नक्षत्र पूर्वा भाद्रपदमध्ये आहेत. चला तर मग पाहूया, शनीचा प्रभाव मेष, कुंभ आणि मीन राशींवर कसा पडेल.