२१ ऑगस्टपासून या राशींना जे हवं ते मिळणार! अचानक धनलाभ तर नोकरीत प्रगती
Shukra Gochar in August: ज्योतिष शास्त्रात शुक्र हा धन, संपत्ती आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो. शुक्र एक ठराविक काळानंतर आपली रास बदलतो. २१ ऑगस्ट रोजी शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल आणि १४ सप्टेंबरपर्यंत या राशीत राहील. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. शुक्राचं हे गोचर सर्व १२ राशींवर परिणाम करेल. काही राशींसाठी ही वेळ चांगली असेल, तर काहींसाठी थोडी अडचणीची ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या राशींना फायदा होईल आणि काय परिणाम दिसून येतील.