सूर्यग्रहण लवकरच लागणार! ‘या’ ५ राशींवर होणार शुभ-अशुभ परिणाम, सुतक काळ, वेळ जाणून घ्या…
Surya Grahan Timing: या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण ७ सप्टेंबरला झालं आणि आता शेवटच्या सूर्यग्रहणाची वेळ आली आहे. २०२५ मधील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण काही दिवसांत लागणार आहे आणि याचा पाच राशींवर जास्त परिणाम होणार आहे.
सप्टेंबर महिन्यात १५ दिवसांत २ ग्रहण लागणार आहेत. ७ सप्टेंबरला शनीच्या कुंभ राशीत चंद्रग्रहण झाले आहे. आता २१ सप्टेंबरला कन्या राशीत सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण सर्व १२ राशींवर परिणाम करेल पण काही राशींवर त्याचा जास्त परिणाम होईल.