“त्याचे विवाहबाह्य संबंध होते…”, फैजल खानचा भाऊ आमिर खानबद्दल मोठा दावा; म्हणाला…
अभिनेता फैजल खानने त्याचा भाऊ आमिर खानवर गंभीर आरोप केले आहेत. फैजलने आमिरच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल वक्तव्य केले असून, त्याचे जेसिकाबरोबर संबंध असल्याचे सांगितले आहे. फैजलने कुटुंबीयांबरोबरचे सर्व संबंध तोडल्याचे जाहीर केले आहे. खान कुटुंबाने फैजलच्या आरोपांवर दु:ख व्यक्त केले असून, त्याच्या आरोग्यासाठी सर्व निर्णय वैद्यकीय सल्ल्यानुसार घेतले असल्याचे स्पष्ट केले.