८ वर्षांच्या थेरपीनंतर आमिर खानची लेक डिप्रेशनमधून बाहेर, आयरा भावुक होत म्हणाली…
बॉलीवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान नेहमीच मानसिक स्वास्थ्यावर खुलेपणाने बोलत आली आहे. ती डिप्रेशनशी झुंज देत होती आणि थेरपी घेत होती. आयरा 'अगत्सू' नावाची संस्था चालवते, जी मानसिक स्वास्थ्याविषयी माहिती देते. आयराने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं की, तिचं थेरपीचं उपचार संपलं आहे. ती आता औषधं घेत आहे आणि स्वतःची काळजी घेणं शिकली आहे.