“आम्ही चुकून भेटलो आणि…”, गौरी स्प्रॅटबरोबरच्या नात्याबद्दल आमिर खानची प्रतिक्रिया
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या कामामुळे चर्चेत असतो, पण वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येतो. दोन महिन्यांपूर्वी त्याने प्रेयसी गौरीची ओळख करून दिली. आमिरचे याआधी रीना दत्ता आणि किरण रावबरोबर लग्न झाले आहे. त्यांच्याबरोबर घटस्फोट झाल्यानंतर आयुष्यातील प्रेमाची आशाही संपली असल्याचे आमिरने सांगितलं. पण मग गौरीने त्याच्या आयुष्यातली प्रेमाची पोकळी भरून काढली. “गौरी आणि मी चुकून भेटलो आणि आम्ही एकमेकांशी जोडले गेलो. आमची मैत्री वाढत गेली. मग हळूहळू प्रेम झालं.