अहान पांडेने ‘या’ कारणामुळे केलं नाही ‘सैयारा’चं प्रमोशन, दिग्दर्शकाचा खुलासा; म्हणाले…
मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' चित्रपट १८ जुलै रोजी प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अहान पांडे व अनित पड्डा यांनी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. प्रमोशन न करता चित्रपटाची क्रेझ वाढवण्याची स्ट्रॅटेजी मोहित सुरी यांनी 'आशिकी २'च्या वेळीही वापरली होती.