विमान अपघातात वाचलेल्या व्यक्तीला अभिनेत्री म्हणाली खोटारडा, ट्रोल होताच डिलीट केली पोस्ट
१२ जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातात २७४ जणांचा मृत्यू झाला. विश्वासकुमार रमेश हा एकमेव वाचलेला व्यक्ती आहे. गायिका सुचित्रा कृष्णमूर्तीने त्याच्या वाचण्याबद्दल शंका उपस्थित केली होती, याबद्दल तिने पोस्ट केली होती परंतु सत्य समजताच नंतर तिने माफी मागितली. सुचित्राने चुकीची माहिती शेअर केल्याबद्दल तिच्यावर सोशल मीडियावर टीका झाली. त्यामुळे तिने नंतर ट्विट डिलीट करून खेद व्यक्त केला.