“आम्ही वकील आहोत, कॉमेडीयन नाही”, Jolly LLB 3 वर दिल्लीच्या नामांकित वकिलांची प्रतिक्रिया
'जॉली एलएलबी ३' चित्रपट १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे, परंतु तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुण्यातील वकील ॲड. वाजेद खान आणि ॲड. गणेश म्हस्के यांनी चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली आहे. दिल्लीतील वकील ए. पी. सिंह यांनीही चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे, कारण त्यात वकील आणि न्यायाधीशांची खिल्ली उडवली आहे. पुणे न्यायालयाने अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि दिग्दर्शक सुभाष कपूर यांना समन्स जारी केले आहे.