Video : आईचं ‘ते’ वाक्य ऐकताच अमिताभ बच्चन भावुक, KBC च्या मंचावर घडलं असं काही की…;
अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती' सीझन १७ चे सूत्रसंचालन करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त १० ऑक्टोबर रोजी जावेद अख्तर व फरहान अख्तर यांनी कार्यक्रमात हजेरी लावली. या भागात अमिताभ बच्चन त्यांच्या आईच्या व्हिडीओमुळे भावुक झाले. जावेद अख्तर यांनी अमिताभ यांच्याबद्दल कौतुक केले. फरहानने दोघांना प्रश्न विचारले, ज्यावर जावेद यांनी अमिताभ यांच्यासारखं फिल्म इंडस्ट्रीत दुसरे कोणीही नसल्याचे सांगितले.