“आईवडिलांना महागड्या हॉटेलमध्ये नेलं, तेव्हा घाबरलो होतो”, बिग बींनी सांगितली जुनी आठवण
'कौन बनेगा करोडपती'च्या नव्या पर्वात अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लहानपणीची आठवण सांगितली. एक स्पर्धक आपल्या आईबरोबर आला होता आणि त्याने आईवडिलांना रेस्टॉरंटमध्ये नेल्याची आठवण शेअर केली. त्यावर अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, त्यांनीही पहिल्यांदा 'मोती महल' हॉटेलमध्ये आईवडिलांना नेले होते. तसेच 'कभी कभी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या आईवडिलांनी शशी कपूरच्या आईवडिलांची भूमिका केली होती.