घटस्फोटाच्या चर्चादरम्यान अखेर एकत्र दिसले ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन; फोटो पाहिलात का?
मागील काही महिन्यांपासून अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या. मात्र, अनु रंजनने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या फोटोमध्ये ऐश्वर्या, तिची आई वृंदा राय, अभिषेक व अनु रंजन हसून पोज देताना दिसत आहेत. अनुच्या या पोस्टमुळे चाहते खूश झाले आहेत.