“तेव्हा आईला पाणी दिलं असतं तर कदाचित…”, बॉलीवूड अभिनेत्याला आजही सतावतंय ते दु:ख
बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीनं आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला. वयाच्या १४व्या वर्षीच त्यानं आई-वडिलांना गमावलं. आईच्या शेवटच्या क्षणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यानं तिला पाणी दिलं नाही, ज्याचा त्याला आजही त्रास होतो. आईच्या निधनानंतर तो आतून तुटला होता. अर्शदनं राज शमानी यांच्या पॉडकास्टवर या वेदनादायी आठवणी शेअर केल्या.