भूमी पेडणेकर रोज तूप खाऊनही राहते फिट! अभिनेत्रीने सांगितलं स्वत:च्या फिटनेसचं रहस्य
बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिच्या सौंदर्य आणि फिटनेसबाबतच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. 'द रॉयल्स' वेबसीरिजमधील लुकबाबत तिला टीकेचा सामना करावा लागला होता. भूमीने सांगितलं की, प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे निर्णय घ्यायला हवेत. तिने तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दलही माहिती दिली. भूमी लवकरच 'दलदल' या वेबसीरिजमध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.